रोगप्रतिकारशक्ती संतुलीत ठेवणारे आयुर्वेदीक औषध ‘शतप्लस’ Read More

Shatplus Immunity booster

पुणेमानवी रोगप्रतिकारशक्ती संतुलीत ठेवणारे शतप्लस हे आयुर्वेदीक औषध बीव्हीजी लाईफ सायन्सच्या वतीने विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोना रूग्णांवरील वैद्यकीय चाचण्यांमध्ये हे औषध उपचारासाठी फायदेशीर ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे, असा दावा बीव्हीजीचे संस्थापक संचालक हणमंतराव गायकवाड यांनी केला आहे.

शतप्लस आयुर्वेदिक औषधाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी नायडू हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ.सुधीर पाटसुटे, बीव्हीजी ग्रुपच्या बीव्हीजी लाईफ सायन्स लिमिटेडचे उपाध्यक्ष डॉ. पवन के. सिंघ आणि वैद्य हरिष पाटणकर आदी उपस्थित होते. कोरोना साथीच्या काळात हे औषध म्हणजे निरोगी शरीरासाठी आणि चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आशेचा किरण आहे, असा आशावादही गायकवाड यांनी व्यक्त केला. Read More