कोरोनावर ‘शतप्लस’ औषध गुणकारी असल्याचा बीव्हीजी ग्रुपचा दावा Read More
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. औषधे, बेड आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून रूग्णांचे हाल होत आहेत. पुण्यात बीव्हीजी ग्रुपने एक औषध बाजारात आणले असून ते कोरोनावर गुणकारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पुणे – देशात आणि राज्यात कोरोना संसर्ग झाल्यानंतर या घातक विषाणूचा नायनाट करू शकेल, असे औषध शोधण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप या रोगावरील रामबाण उपाय सापडलेला नाही. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातील देखील वेगवेगळ्या औषधी समोर आणल्या आहेत. पुण्यात बीव्हीजी ग्रुपने देखील कोरोनावर एक औषध बाजारात आणले आहेत. ‘शतप्लस’, असे या औषधाचे नाव असून ते कोरोनावर गुणकारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. Read More